चार शाळांची तालुकास्तरावर झेप muktipath quiz venture

चार शाळांची तालुकास्तरावर झेप
-मुक्तिपथचा प्रश्नमंजुषा उपक्रम

गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे प्रश्नमंजुषा उपक्रम घेतला जात आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी व मोदुमडूगु या दोन केंद्राच्या क्लस्टरस्तरीय स्पर्धेतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. एकूण आठ शाळांपैकी चार शाळांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली आहे.
देवलमरी केंद्रस्तरीय स्पर्धेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारामचे ७ विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदारामचे ३ विद्यार्थी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व्येंकटापुर येथील ४ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवलमरीचे ६ असे एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समन्वय शिक्षक म्हणून डी. बी. मारगोंवर, एच. डी. उराडे, टी.एच.फूलझेले, एस.पी. डोंगरे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी परीक्षक लक्ष्मण कन्नाके व एस. आर. आस्वले यांनी उत्कृष्ठ परीक्षण करून प्रथम क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम व द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवलमरी या शाळांना दिला आहे.
मोदुमडूगु केंद्रस्तरीय स्पर्धेत राजमाता राजकुवारबाई माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडूगु-४, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मद्दीगुडम-४, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामय्यापेठा-३, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलगुर-३ अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यासंदर्भात उत्कृष्ट पोस्टर, सादरीकरण व गीत गायन केले. समन्वय शिक्षक म्हणून वी. एस. बोपानवर, एस.एन. कोंडगुरला, आर.आर.चांदेकर, वी.डी.खांडेकर उपस्थित होते. परीक्षक साई तुलसीगारी व दौलत रामटेके यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून उत्कृष्ठ शाळा म्हणून राजमाता राजकुवारबाई माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडूगु, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मद्दीगुडम या शाळांची निवड केली. दोन्ही केंद्रस्तरीय स्पर्धांचे आयोजन व नियोजन तालुका संघटक निलम मुळे, तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी, स्पार्क कार्यकर्ता स्वप्नील बावणे यांनी केले.