Accident : ट्रॅकर उलटल्याने युवक गंभीर

ट्रॅकर उलटल्याने युवक गंभीर
– कोजबी गावाजवळील घटना

अपघातग्रस्त ट्रॅक्टर

आरमोरी : ट्रॅक्टरवर विद्यूत रोहित्र वाहून नेत असतांना अनियंत्रित झालेली ट्रॅक्टर उलटल्याने यात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास वैरागडपासून जवळच असलेल्या कोजबी गावाजवळ घडली. जयंत तुलावी रा. कढोली असे जखमी युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली येथील ट्रॅक्टरमध्ये विद्यूत रोहित्र मांडून कुरखेडाकडे नेल्या जात होते. दरम्यान वैरागडमार्गे कुरखेडाकडे जात असताना कोजबी गावालगत असलेल्या वळणावर ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर वळणावरील बीएसएनएल टॉवरनजीक उलटल्या गेले. यात ट्रॅक्टरमध्ये असलेला जयंत गंभीर जखमी झाला. तत्काळ त्याला उपचारार्थ वैरागड येथील प्राथमिक केंद्रात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.