‘गाव करी ते राव न करी’ : वीस वर्षांपासून दारूबंदी कायम

‘गाव करी ते राव न करी’ : वीस वर्षांपासून दारूबंदी कायम 
डोंगरमेंढा गावाची एकता 
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा गावाने सलग वीस वर्षांपासून दारूबंदी टिकवून ठेवत इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. गावातील महिला व पुरुषांच्या एकतेमुळेच ही दारूबंदी कायम टिकून आहे.  ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीप्रमाणे ग्रामस्थांची वाटचाल सुरु आहे. 

डोंगरमेंढा येथील ग्रामस्थ
देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर ग्रामपंचायत अंतर्गत  डोंगरमेंढा गावाचा समावेश आहे. या गावात जवळपास ४५० एवढी लोकसंख्या आहे. या गावाला लागून महादेवाचे गड पहाडी आहे. या गावाला प्रेक्षणीय रम्य असं निसर्गाचा देखावा लाभलेला आहे. मागील २० वर्षांहून अधिक काळापासून महिला व पुरुषांनी एकत्र येऊन दारूविक्रीमुक्त गाव निर्माण केला आहे. ही दारूबंदी टिकवण्यामध्ये ग्रामस्थांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तालुक्यातील विशेष गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गावातील महिला व पुरुष गावातील दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यामुळे दारूमुक्त गाव म्हणून हे गाव नावारूपास आले आहे.