शिक्षक मतदार संघाची निवडणूक : महाविकास आघाडीचे Adbale विजयी

शिक्षक मतदार संघाची निवडणूक :  महाविकास आघाडीचे अडबाले विजयी
देसाईगंज : नागपूर विभाग शिक्षक आमदार पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले सुधाकर गोविंदराव अडबाले हे आपल्या प्रतिस्पर्धी नागो गाणार यांचा 9 हजार 500 मताच्या फरकाने पराभव करून विजयी झाले. त्यानिमित्त देसाईगंज तालुका महाविकास आघाडीच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

विजय जल्लोष साजरा करतांना पदाधिकारी
 यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते परसराम टिकले, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिंकु बावणे, सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके, शिवसेनेचे नंदु चावला, राष्ट्रवादीचे विलास गोटेफोडे, मनोज ढोरे, माजी नगरसेवक भीमराव नगराळे, बालाजी ठाकरे, ज्ञानदेव पिलारे, जग्गी परसवाणी, शिक्षक संघाचे विलास पुस्तोडे, माणिक पिलारे, अरुण राजगीरे, वसंत गोंगल, पुरुषोत्तम उरकुडे, हंसराज लांडगे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुरखेडा येथे जल्लोष
कुरखेडा : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून विधानपरिषद करीता महाविकास आघाडी व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच कुरखेडा येथील सागर व फव्वारा चौकात फटाके फोडून शिक्षक संघटना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

यावेळी जूनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजे, विदर्भ शिक्षक संघाचा विजय असो, अशी घोषणाबाजी देण्यात आली. याप्रसंगी विदर्भ राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सी. एन. नरूले, मुख्याध्यापक आर. एम. अलकदेवे, सुधाकर उईके, यु. जी. वाघाडे, युकॉंचे तालुकाध्यक्ष गिरीधर तितराम, सचिव छगन मडावी, जूनी पेंशन हक्क संघटनेचे सुधीर ठवरे, एल. बी. कोडापे, एन. व्ही. गेडाम, एम. पी. सोनकुकरा, आर. बी. कोडाप, बी. आर. सोरते, एम. ए. नवघडे, शिवा भोयर, पितांबर नरडंगे, बगमारे व विदर्भ माध्यमिक संघ, जूनी पेंशन हक्क संघटना तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.