accident -भीषण अपघात : दुचाकीस्वारासह दोघे ठार

भीषण अपघात : दुचाकीस्वारासह दोघे ठार
कोरची : प्रवासी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात दुचाकीस्वारासह प्रवासी वाहनातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी कुरखेडा मार्गावरील मोहगाव गावाजवळ घडली. छबिलाल सोरी रा. मोहगाव असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातग्रस्त वाहन
प्राप्त माहितीनुसार महिंद्रा कंपनीचे एम. एच. 04 बीक्यू 1924 क्रमांकाचे वाहन कोरची येथून कुरखेडाकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगात जात होते. दरम्यान तालुका मुख्यालयापासून 2 किमी अंतरावर असलेल्या मोहगावानजीक भरधाव महिंद्राने समोरुन येत असलेल्या दुचाकी क्र. सीजी 08 एफ 3217 या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार रस्त्याच्या एका कडेला तर दुचाकी रस्त्याच्या दुस-या बाजुला फेकल्या गेली. तर प्रवासी घेऊन जाणारे वाहने रस्त्याच्या कडेला उलटल्या गेले. यात प्रवासी वाहनाचेही प्रचंड नुकसान झाले. यावेळी वाहनात दोन चिमुकल्यांसह दहा प्रवासी होते. यात प्रवासी वाहनातील एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून मृतक महिलेची ओळख पटू शकली नव्हती. अपघातानंतर प्रवासी वाहन चालक वाहन सोडून पसार झाल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक फुलकुवर व चमू करीत आहेत.