दारुसह पावणे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

दारुसह पावणे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
अहेरी : चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची तस्करी करीत असतांना अहेरी पोलिसांनी वांगेपल्ली नदीघाट पुलियावर राबविलेल्या मोहिमेत देशी दारुसह 7 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास पार पाडली. दारु तस्करी प्रकरणी सुमित रमेश चिंतलवार (32) रा. नागपूर, निखील रणदिवे (32) रा. बल्लारशहा जि. चंद्रपूर व सुरज संजय रत्नावार (36) रा. अहेरी यांचेवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह अहेरी पोलिस
 वांगेपल्ली नदीघाट पुलियामार्गे अवैधरित्या दारुची तस्करी केल्या जाणार असल्याची माहिती गुप्त माहिती अहेरी पोलिसांनी प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे अहेरी पोलिसांद्वारे विशेष पथकाद्वारे रात्रीपासून वांगेपल्ली नदीघाट पुलियावर सापळा रचला. दरम्यान एम. एच. 33 एफ 4333 या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 48 हजार रुपये किंमतीची विदेशी दारु, 1 लाख 40 हजाराची देशी दारु अशी 1 लाख 88 हजाराच्या दारुसह चारचाकी वाहन किंमत 6 लाख असा एकूण 7 लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक देविदास मार्कंडी मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक हेमराज वाघाडे, पोलिस हवालदार शंकर डांगे यांचेसह पोलिस पथकाने पार पाडली. पुढील तपास पोलिस हवालदार शंकर डांगे करीत आहेत.