अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Gadchiroli Today
गडचिरोली : नाटक बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या आरोपीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कलम 354 व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सहारे (32) रा. भगवानपूर ता. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास गावातच नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. सदर नाटक बघण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी बहिण व अन्य नातेवाईकांसह गेली होती. नाटक बघत असतांना लघूशंकेसाठी ती बाहेर आली असता आरोपी अजय सहारे याने मुलीचा विनयभंग केला. पिडीताने विरोध केला असता आरोपीने चुकून सदर प्रकार झाल्याचे सांगितले. मात्र पुन्हा पिडीता मुलगी बाहेर आली असता आरोपीने तिचा पुन्हा विनयभंग केला. याची माहिती पीडितेच्या बहिणीने ग्रामस्थांनी दिली. या संदर्भात शुक्रवारी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीअंती तत्काळ पोलिसांनी आरोपी अजय सहारे यास अटक केली. आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत आहेत.