Theft : चोरटयांनी लांबवीले 3 लाखांचे दागिने

Gadchiroli Today
 गडचिरोली : अज्ञात चोरट्यांनी घर फोडून 3 लाख रुपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावात घडली. यासंदर्भात आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्राप्त माहितीनुसार आष्टी येथील रहिवासी सारथी विपूल हलदर ही महिला आपल्या भाच्याच्या लग्नाकरिता 29 जानेवारीला लगाम येथे गेली होती. कार्यक्रम आटोपून ती गुरुवारी आष्टी येथे परत आली तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश करताच घरातील साहित्य अस्तव्यस्त पडून होते. याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. चोरट्यांनी 8 हजार 500 रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख रुपयाचा माल लंपास केला. चोरट्यांनी 30 किंवा 31 जानेवारीलाच चोरी केल्याची शंका व्यक्त होत आहे. तक्रारीअंती अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत.