19 ला गोगांव येथे शिवजन्मोत्सव सोहळा

19 ला गोगांव येथे शिवजन्मोत्सव सोहळा
Gadchiroli Today
गडचिरोली : छत्रपती शिवशंभू युवा प्रतिष्ठाण गोगावच्या वतीने रविवार, 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा व महाशिवरात्रीनिमित्त शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करण्यात येईल. सायंकाळी 5 वाजतापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शिवशंभू युवा प्रतिष्ठाण गोगावच्या वतीने करण्यात आले आहे.