खरपुंडी येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल

खरपुंडी येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल 
-६५ लिटर मोहफुलाची दारू जप्त 

गडचिरोली: तालुक्यातील खरपुंडी येथील विक्रेत्याकडील ६५ लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी रमेश खोब्रागडे या विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

खरपूंडी येथे दारूविक्री चालू-बंद होती. गावात ८ विक्रेते अवैधरित्या दारूची विक्री करीत होते. त्यामुळे गावात शांतता, सुव्यवस्था  व आरोग्य धोक्यात आले होते. अशातच ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून दारू बंद करण्यासाठी ठराव घेऊन पोलिस स्टेशन गडचिरोली येथे दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यासाठी तक्रार अर्ज व ठराव देण्यात आला होता. त्याअनुषंगाने गाव संघटनेच्या गुप्त माहितीचे आधारे पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने दारू विक्रता रमेश खोब्रागडे याच्या घरी धाड टाकून घराची तपासणी केली असता, 65 लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू मिळाली. मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी पथकाचे धनराज चौधरी, पो.ना.स्वप्नील कुडावले, पो.ना. परशूराम हलामी, सुजाता ठोंबरे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ कार्यकर्ते अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम, स्विठी आखरे उपस्थित होते.  दारू बंदी करण्यासाठी ग्रामसभेत कड्डक अमलबजावणीसाठी ठराव घेऊन दारू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही होणार आहे. या कारवाईमुळे दारू विक्रत्याचे धाबे दणाणले आहेत.