Congress Committee न्याय मागण्यांसाठी हजारोंचा मोर्चा तहसीलवर धडकला

– मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन 

आरमोरी : तालुक्यातील नागरिक, भूमिहीन, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांशी त्रस्त आहेत. नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येत 13 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. 

 मोर्चात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा काँग्रेस प्रभारी डॉ नामदेव किरसान, महासचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस महासचिव विश्वजीत कोवासे, वामनराव सावसागडे, रजनीकांत मोटघरे, राजू गारोदे, वृंदा गजभिये, नगरसेविका निर्मला किरमे, दुर्गा लोणारे, आनंदराव आकरे, मधुकर दोनाडकर, छगन सडमाके, जोती सोनकुसरे, शालिक पत्रे, दिवाकर पोटफोडे, अशोक माकडे, विश्वेश्वर दर्रो, दतु सोमनकर, माजी पंस उपसभापती विनोद बावनकर, प्रा. शशिकांत गेडाम, तुकाराम वैरकर, विजय सुपारे, विजय चाटे, अंकुश गाढवे यासह हजारो नागरिक उपस्थित होते. 

या मागण्यांकडे वेधले लक्ष 
आरमोरी शहरातील हद्दवाढ झालेल्या जमिनीच्या आखीव पत्रीका भोगवटदाराच्या नावे द्यावी, शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे भारनियमन बंद करावे, गरजु लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल द्यावे, प्रधानमंत्री रमाई, शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते तात्काळ द्यावे, शरहातील ले-आऊटची चौकशी करून त्यावर बंदी घावी, नगर परिषदेला नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, पांदण रस्त्यांचे मजबुतीकरण करावे, कृषीपंपांचे मीटर रिडींग करून बिल द्यावे, 37 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरावीत, आरमोरीत 100 खाटाचा दवाखाना मंजूर करावा, बुरड कामगारांना बांबूचा पुरवठा करावा, रामसागर तलावाचे सौंदर्यीकरण करावे, जमिनीचे पट्टे द्यावे, कृषीपंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावे, जंगली हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.