१९ ला शिवजन्मोत्सवा निमित्त महा रक्तदान

गडचिरोली TODAY 
गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील दुर्गा चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त महा रक्तदानासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिवजन्मोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तिपूजन, सकाळी ११ वाजता चित्रकला प्रदर्शनी व महारक्तदान शिबिराची सुरवात, दुपारी १२ वाजतापासून सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, भाषण स्पर्धा, पोवाळा स्पर्धा व दुपारी ४ वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे पदाधिकारी उमेश उदापूरे, चितेश शेंडे, विक्रम पुरी, रोशन गहाणे, नितेश कोरे, प्रवीण पटोले, मुन्ना पुरी यांनी केले आहे.