आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी : देसाईगंज येथे भरती मेळावा

गडचिरोली TODAY 
देसाईगंज : स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता SUZUKI MOTOR GUJRAT PRIVATE LIMITED या कंपनी मार्फत भरती मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. 
 

या भरती मेळाव्यासाठी वर्ष २०१८, २०१९, २०२०, २०२१ व २०२२ मध्ये Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & amp; Die Maker, Plastic Processing Operator, Tractor Mechanic and Painter General या व्यवसायातून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत. मागील दोन वर्षा पासून SUZUKI MOTOR या जिल्हयात भरती आयोजित करत असून २५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोक-या देण्यात आलेल्या आहेत. सदरील भरती मेळाव्याला जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारांनी सहभागी व्हावे. अधिक माहिती करिता ९५९५७४०९१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.