Accident धावत्या दुचाकीचा टायर फुटल्याने युवक ठार तर काका जखमी

 
गडचिरोली TODAY
गडचिरोली : भरधाव दुचाकीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावाजवळ  शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अशोक पुसू पुंगाटी (32) इंदिरा वार्ड रा. एटापल्ली असे मृतक युवकाचे नाव असून अशोकचे काका टेका पुंगाटी (50) रा. कृष्णार ता. भामरागड असे जखमीचे नाव आहे.

संग्रहीत छायाचित्र

प्राप्त माहीतीनुसार, अशोक व त्याचे काका टेंका पुंगाटी हे दोघे दुचाकीने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अहेरीवरुन एटापल्लीकडे जात होते. दरम्यान गुरुपल्लीजवळ दुचाकीचे टायर फुटल्या गेले यामुळे अशोकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यावरच पडले. यात अशोकच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर काका गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एटापल्लीचे ठाणेदार विजयानंद पाटील यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहेत.