Gas Cylinder Blast, घरासह जीवनावश्यक साहित्यांची राखरांगोळी

गडचिरोली TODAY

गडचिरोली : घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याची घटना सिरोंचा तालुकास्थळापासून जवळच असलेल्या नगरम येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील कुटूंबिय गावाबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली गेली.

सिलेंडरच्या स्फोटात घराला लागलेली आग

प्राप्त माहितीनुसार,  नगरम येथील श्रीधर कोडीवार हे आपल्या कुटूंबियांसह बाहेरगावी गेले होते. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या सुमारास एकाएक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली. यात घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती तत्काळ ग्रामस्थाने सिरोंचा नपं अग्निशमन विभागाला दिली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होतपर्यंत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात कोडीवार यांचे लाखोचे नुकसान झाले.