कुरखेडा नपंला मिळाले नवीन शिलेदार

गडचिरोली TODAY 
कुरखेडा : स्थानिक नगरपंचायत विषय समिती सभापतीच्या वार्षिक निवडणुकीत आज खांदेपालट करण्यात आली. दोन्ही गटाकडून नवीन शिलेदारांची अविरोध निवड करण्यात आली. 
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदावर आघाडीचे जयेंद्रसिंह चंदेल, महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर कुंदा तितिरमारे, उपसभापती पदावर भाजपाच्या दूर्गा गोटेफोडे तर आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती पदावर अतूल झोळे यांची अविरोध निवड करण्यात आली. बांधकाम समिती सभापतीपद उपाध्यक्ष जयश्री रासेकर यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी माधूरी सलामे यांनी भूमिका पार पाडली. 

नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करतांना पदाधिकारी
निवडणूक परिणामाची घोषणा होताच नवनिर्वाचित सभापतीं महाविकास आघाडीतील कॉंग्रेस तालुकाध्यक्ष जिवन नाट, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, गटनेता आशिष काळे, बबलू हूसैनी, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, माजी सभापती ऍड. उमेश वालदे, उल्हास देशमुख, नगरसेवक व नगरपंचायत कर्मचा-यांकडून पुष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.