आष्टी पोलिसांनी वाहनासह जप्त केली साडेसहा लाखाची दारु

– एकावर गुन्हा दाखल 
गडचिरोली TODAY
 गडचिरोली : आष्टी पोलिसांनी कोनसरी-रायपूर जंगल परिसरात सापळा रचून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनासह 6 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारी केली. याप्रकरणी वाहन चालक नरेश रामबाग कंजरा रा. जलनगर जि. चंद्रपूर याचेविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

आरोपीसह जप्त केलेली दारू

चंद्रपूर जिल्ह्यातून आष्टी परिसरात अवैधरित्या  चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी कोनसरी-रायपूर जंगल परिसरात सापळा रचला असता एमएच 33 बीव्ही 4151 हे चारचाकी वाहन संशयास्पद वाटले.सदर वाहन थांबवून चौकशी केली असता 1 लाख 44 हजार रुपये किंमतीची देशी दारु व चारचाकी वाहन अंदाजे किंमत 5 लाख असा एकूण 6 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय राठोड, पोलिस हवालदार मडावी, पोलिस शिपाई रायसिडाम, मेदांडे, बैलमारे, चौधरी यांनी पार पाडली.