कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

– भाकपाच्या नेतृत्वात समविचारी पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडचिरोली TODAY
गडचिरोली : प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला आठ वर्षे झाली तरी त्यांचे खुनी व या हल्ल्यामागील खरे सुत्रधारांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा द्या, अशी मागणी करीत भाकपच्या नेतृत्वात समविचार पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनात सहभागी भाकपा कार्यकर्ते 

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ 16 फेब्रुवारी 2015 रोजी बेछुट गोळीबार करण्यात आला. ते व त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे या गंभीर जखमी झाल्या. 20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांचे निधन झाले. या घटनेला आज आठ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप ही‌ त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. या घटनेचा तपास आजपर्यंत विशेष तपास पथक एसआयटी कडे होता. आणि आता तो‌‌ दहशतवाद विरोधी पथकाकडे एटीएसकडे सोपविण्यात आला आहे.  परंतु फरार आरोपींना शोधने कठिण जात आहे, असे बयान देऊन आपली जबाबदारी झटकण्याचे काम संबंधित विभागाचे अधिकारी करीत आहेत. परिणामता कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर व इतरही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना मोकाट फिरण्याची मुभा मिळत आहे. वयोवृद्ध नेत्यावर धर्मांध शक्तींने भ्याडपणे हल्ला करून ठार मारले असतांनाही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून राज्य सरकार शिक्षा देवू शकले नाहीत. त्यामुळे या‌ मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा करावी, या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले.

याप्रसंगी कॉ. डॉ. महेश कोपूलवार, भाकपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, अभारिपा केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बीआरएसपी अध्यक्ष राज बन्सोड, पीरिपा जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर,  प्रदिप भैसारे, हंसराज उंदिरवाडे, नीता सहारे, अशोक खोब्रागडे, केशवराव सामृतवार, नरेंद्र रायपूरे,वनमाला झाडे,पुनम भैसारे, गोविंदा ब्राह्मणवाडे, विलास निंबोळकर, सुरेश सोनटक्के, मिनाक्षी सेलोकर, सिंधू कापकर, कुसूम टेकाम, मंगला बुधे,अमिता कोरवरकर, अमिला नैताम, दुर्गा कुर्वे, मिनाक्षी छापले, राधा ठाकरे, मिरा बांगरे, प्रकाश खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे, अमोल दामले आदी उपस्थित होते.