झोपेतच 35 वर्षीय इसमाचा मृत्यू

गडचिरोली TODAY
गडचिरोली :  अज्ञात आजाराने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सिरोंचा तालुक्यातील मोगापूर येथे रविवारी उघडकीस आली आहे.  सडवली चिनमल्लू पोट्टाला (35) असे मृतक इसमाचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास सडवली हा पत्नी रंजीता व मुलीसह घरी होते. जेवण झाल्यानंतर तिघेही झोपी गेले. दरम्यान सकाळच्या सुमारास सडवली न उठल्याने पत्नीने याची माहिती शेजा-यांना दिली. दरम्यान नागरिकांना सडवली मृतावस्थेत आढळून आला. सिरोंचा पोलिसांनी घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळ गाठित पंचनामा केला. पूढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.