विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे : प्राचार्य गेडाम

शिवाजी हायस्कूल येथे शिलाई मशिनचे वाटप
गडचिरोली TODAY 
कुरखेडा : विद्यार्थ्यांनी आजच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता तांत्रिक शिक्षण घेऊन आयुष्य घडवावे. शिवाजी हायस्कूलमध्ये समता फाउंडेशनव्दारे चालवीत असलेल्या संगणक कक्ष व डी.डी.टी लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान शिक्षण आत्मसात करून यशाची पायरी चढावी असे आवाहन प्राचार्य आनंदराव गेडाम यांनी केले. 
 स्थानिक शिवाजी हायस्कूल येथे समता फाउंडेशन मुंबई व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील जे विद्यार्थी गरजू आहेत अशा विद्यार्थ्यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे पर्यवेक्षक सी.एन.मुंगमोडे, शाळेचे जेष्ठ शिक्षिका माधुरी लांजेवार, संघमित्रा गजभिये, शाळेतील शिक्षक चंद्रकांत नरुले, प्रभाकर मुंगनकर व पालक मिलिंद बडोले, सुषमा देशमुख, असिफ शेख, रमेश तुलावी, रत्नपाल बनकर उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्रा.किशोर कोल्हे, प्रा.रुपेश भोयर, नोगेश गेडाम, महेंद्र नवघडे, यु.जी.वाघाडे, प्रा.के.पी.सोरते, सोनिका वैद्य आणि संगणक विभागाचे प्रशिक्षक श्यामसुंदर हटवार, डी.डी.टी विभागाच्या किरण कोडाप व शिक्षकेत्तर कर्मचारी शिवा भोयर, कालिदास मालोडे, घनश्याम भोयर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन लीकेश कोडापे तर आभार प्रदर्शन भीमराव सोरते यांनी मानले.

या विद्यार्थ्यांना मिळाली शिलाई मशिन 
शिलाई मशिन वाटप झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काजल प्रल्हाद नैताम वर्ग ८ वा, रुक्सार असिफ शेख वर्ग ८ वा, प्रतीक्षा कालिदास राऊत वर्ग ९ वा, दिव्या संजय गुरनुले, रोहित राजेंद्र तुलावी वर्ग १२ वा, भारती भगवान बोर्सरे वर्ग १२ वा, गौतमी मिलिंद बडोले वर्ग ८ वा, रोहिणी रमेश तुलावी वर्ग १२ वा, आचल रवी मानकर वर्ग ८ वा, नुरअफसा असिफ शेख वर्ग ९ वा, शुशीला जनार्धन धुर्वे वर्ग १० वा, संचिता रत्नपाल बनकर वर्ग ९ वा, कीर्ती रमेश मुंगमोडे वर्ग १२ वा , शिवानी विलास हिडामी वर्ग १० वा, साक्षी बंडू देशमुख वर्ग १२ वा या विद्यार्थ्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या .