मच्छीखड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

गडचिरोली TODAY
गडचिरोली : मच्छीखड्ड्यात पाय घसरून पडल्याने युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजता चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर येथे घडली. शुभम देवाजी गेडाम (24) असे मृतकाचे नाव आहे.
शुभम हा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 9 वाजता शेळ्या चारण्याकरीता गावातील गोलदार यांच्या शेताजवळ गेला होता. 11 वाजता शेळ्या परत आल्या. मात्र शुभम परत आला नाही. वडिलांनी गोलदार यांच्या शेतातील मच्छी खड्ड्यात पाहिले असता, पाण्याची बॉटल व चप्पल पाण्यात तरंगताना दिसली. खड्ड्याच्या काठावर पाय घसरल्याचे दिसले. मच्छी खड्ड्यात शोध घेतला असता, पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. शेळीला पाणी पाजत असताना एक शेळी खड्ड्यात पडली. तिला काढण्याकरीता तो पाण्यात उतरला. परंतु त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.