१६ तास विद्युत पुरवठा द्या, अन्यथा आंदोलन : आप

निवेदन सादर करतांना आप चे पदाधिकारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांना निवेदन 
गडचिरोली TODAY 
कुरखेडा : कृषी पंपासाठी दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून १६ तास करावे, अन्यथा येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार, असा इशारा आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. 
कुरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे. यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या  स्थितीत आहेत. सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल. यापूर्वी 12 तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले. परंतु, मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले आहेत. यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांच्या हातातून पीक निघून जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उद्योगविरहित व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांवर  होणाऱ्या अन्याया विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आप ने दिलेला आहे. 
निवेदन सादर करतांना तालुका संयोजक ईश्वर ठाकूर , तालुका सचिव ताहीर शेख, तालुका सह संयोजक अनिकेत आकरे, दीपक धारगाये, पंकज डोंगरे, जिल्हा युवा कार्यकारिणी सदस्य हिरा चौधरी, युवा तालुका सचिव साहिल साहरे,  मीडिया प्रमुख शहेजाद हाशमी, युवा सह सचिव अतुल सिन्द्रम,  सतीश कावडकार, निलेश बसोना, कुमार नवघडे, राकेश जांबंधू  यांच्यासह आप चे कार्यकर्ते उपस्थित होते.