2 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली TODAY
गडचिरोली  : गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 2 मार्च रोजी स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
 सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने 2 मार्च रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.