शासकीय विज्ञान महाविद्यालयात ‘वाय20’ उपक्रम

5 मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : यावर्षी जी20 शिखर परिषदेचे भारत देशाकडे यजमानपद आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील युवकांना त्यांचे मत मांडणे व चर्चा करण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रत्येक जिल्हयातील एका महाविद्यालयात  वाय20 उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात रविवार, 5 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 ‘वाय 20’ कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता होणार आहे. लोकशाही आणि प्रशासनातील तरुणांचा सहभाग या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेला 1 वाजता सुरूवात होणार आहे. दुपारी 2 वाजता नवकल्पना आणि 21 व्या शतकातील कौशल्ये या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 3 वाजता पोस्टर सादरीकरण व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टर व रांगोळी स्पर्धेसाठी विषय एकच आहेत. यात उद्योग 4.0, नवकल्पना आणि 21 व्या शतकातील कौशल्ये, शांतता-निर्माण आणि सलोखा, हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे, आरोग्य, कल्याण आणि खेळ हे विषय आहेत. Youth 20 (Y20) हे सर्व G20 सदस्य देशांतील तरुणांसाठी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक अधिकृत सल्लामंच आहे. Y20 भविष्यातील नेते म्हणून तरुणांना जागतिक समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी आणि सहमती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते.