राज्यात परत महाविकास आघाडीची सत्ता येणार : चंद्रकांत खैरे

शिवगर्जणा यात्रेचे कुरखेडा शहरात भव्य स्वागत 
गडचिरोली TODAY 
कुरखेडा : सर्वोच्च न्यायालयात १६ बंडखोर आमदारांचा निकाल लागताच राज्यात घटणाबाह्य असलेले मिंधे सरकार कोसळत येथे परत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. 
शिवगर्जणा यात्रेचे कुरखेडा शहरात आगमन होताच शहराचा सीमेवर शिवसेना (ठाकरे गट) कडून भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर येथील किसान  सभागृहात आयोजित सभेत शिवसैनिकाना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेश यूवा सेना सचिव शरद कोळी, शिल्पा बोडके, हर्षल काकडे, जिल्हा संपर्क प्रमूख कीशोर पोद्दार, संघटक सूरेश साखरे, प्रकाश मारावार, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हा प्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, सहसंपर्क प्रमूख अरविंद कात्रटवार, माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्र कुमार मोहाबंसी, महिला शिवसेना प्रमुख छाया कूंभारे, यूवतीसेना जिल्हा प्रमूख उमा चंदेल, उपजिल्हा प्रमूख अविनाश गेडाम, लोमेश कोटागंले, पूरषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, डॉ.बंसोड, माजी जिप सभापती वेणूताई ढवगाये, नंदू चावला, विकास प्रधान, नप उपाध्यक्ष जयश्री रासेकर, पाणी पूरवठा सभापती जयेंद्र सिंह चंदेल, माजी सभापती पूंडलीक देशमुख, त्र्यंबक खरखाटे, ज्योत्सणा राजूरकर, देवकी कंकाड्यालवार, स्मिता नैताम, देवेंद्र मेश्राम, आरमोरी तालुका प्रमूख कवडू सहारे, लोमेश हरडे, संगीता गडपायले, शारदा गाथाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 
पुढे बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी सांगीतले की, आजारी असलेल्या शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात करीत खोके व ईडी च्या भीतीने पळून गेलेल्यांना जनता धडा शिकवेल. या घटणाक्रमाने राज्यातील जनतेच्या मनात प्रंचंड चिड निर्माण झाली आहे व उद्धव ठाकरे बाबद मोठी सहानुभूती आहे. सद्या शिवशक्तीला भीमशक्तीची ही जोड मीळाली असल्याने राज्यात मोठ्या बहूमतात महाविकास आघाडीची सत्ता प्रस्तापीत होण्याचा विश्वास खैरे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी यूवा सेना सचिव शरद कोळी यांनी सूद्धा आपल्या अमोघ वाणीतून शिवसैनिकात चेतणा निर्माण केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिवसैनिक गुणाजी कवाडकर यांनी मानले.