नक्षल्यांनी केली मिक्सर मशीनची जाळपोळ

नुकसानग्रस्त मिक्सर मशीन

ताडगाव पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल
गडचिरोली TODAY
गडचिरोली : मिक्सर मशिनची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या बोटनपूंडी-विसामुंडी मार्गावर घडली आहे. नक्षल्यांच्या या कारवाईमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया येथील व्हालिया अँड ब्रदर्स कन्ट्रंक्शन कंपनीअंतर्गत भामरागड तालुक्यातील बोटनपुंडी-विसामुंडी मार्गावर पाईप कलवटचे काम सुरु आहे. दरम्यान सोमवारी रात्रीच्या सुमारास सशस्त्र नक्षल्यांनी संबंधित बांधकामस्थळ गाठित या कामावरील एजेएक्स 2500 क्रमांकाचे मिक्सर मिशनला आग लावित नक्षली जंगलात पसार झाले. यात मिक्सर मशिन जळून खाक झाली. दरम्यान आज मंगळवारी सकाळच्या सुमारास सदर बाब उघडकीस येताच ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या जवानांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. या वृत्तास पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला असून अज्ञात नक्षल्यांविरोधात ताडगाव पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.