वृद्ध कलावंताचे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करा : ॲड. श्याम खंडारे

गडचिरोली TODAY 
चंद्रपूर : वृद्ध कलावंत मानधन शासकीय समिती तातडीने गठीत करून कलावंताचे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेश महासचिव ॲड.श्याम खंडारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. 
महाराष्ट्रात राष्ट्रसंत तूकडोजी महाराज, गाडगे महाराज तथा समस्त महापूरूषाच्या प्रेरणेनी व विचारावर चालणारी जय गूरूदेव सेवा भजन मंडळी, वारकरी मंडळी, सर्वधर्मीय कला व सांस्कृतिक मंडळी, किर्तनकार, नाटक, पथनाट्य, भारूड ,पोवाडा, शाहीरी ई.द्वारा समाज प्रबोधन करणा-या मंडळीनी आपल्या कलेच्या ताकदीवर गावखेड्यापर्यंत कला जिवंत ठेवली. आजही या कला सादरीकरणाला लोकांची तूंबळ गर्दी खेचण्याची ताकद आहे. ही प्रचंड ताकद एकजूट करून कलावंतांना स्वाभीमानाने जगण्यासाठीच्या मागण्या, समस्या, प्रश्न व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासोबतच शासनाने गोरगरीबांच्या कल्याणासाठी मंजूर केलेल्या योजनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी शासनाच्या खांद्याला खांदा लावून प्रभावीपणे कार्य करण्यास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे समस्त पदाधिकारी संपूर्ण ताकदीनीशी शासनाच्या व कलावंतांच्या पाठीशी उभे आहेत. कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांप्रमाणेस कलेच्या सादरीकरणावर उपजिवीका करतो त्या कलावंताची सुद्धा उपासमार झाली. त्यांना तत्काळ अर्थसाहाय्य मंजूर करा, या मागणीसाठी समितीने रस्त्यावर ऊतरून निदर्शने व तिव्र आंदोलनातून दमदार लढा दिला. परिणामी शासनाने सहानूभूतीपूर्वक विचार करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंताना सरसकट पाच हजार रूपये अर्थसहाय्य मंजूर केलेत व निधीची तरतूद सुद्धा केली. मात्र सरकार बदलल्याने मदतीचे वाटप रखडले आहे. अनेक कलावंत ह्या अर्थ सहाय्यापासून वंचीत राहीलेत. 

संग्रहित छायाचित्र
वृद्ध कलावंत शासकीय समिती बरखास्त होवून एक वर्षाचा कालावधी होत आला तरी समित्या गठीत झाल्या नाहीत. त्यामुळे कलावंतांचा जिव पून्हा टांगणीला लागला. हा प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडवावा, याकरीता समितीच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मूनगंटीवार यांची भेट घेवून सर्व कलावंतांना भेडसावणा-या गंभीर समस्या मांडल्या व त्यासाठी सतत पाठपूरावा करीत आहेत. लवकरच चंद्रपूर येथील त्यांच्या निवासस्थानी समितीच्या शिष्टमंडळाने 12 मार्च रोजी भेट घेण्याचे ठरविले आहे. या भेटीदरम्यान, तिनही श्रेणीच्या कलावंताचे मानधनात वाढ करून किमान पाच हजार रूपये इतके  मानधन करावे, पात्र एकल कलावंतांचे मंजूर अर्थसहाय्य निधीचे वाटप करावे, जिल्हानिहाय वृद्ध कलावंतांच्या मंजूरातीचे लक्ष वाढवून दूप्पट करावे,  मानधनासाठी उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये ईतकी करावी, वयोमर्यादा चाळीस वर्ष करावी, कलावंत मानधन समितीचे अशासकीय सदस्य नेमतांना  शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे अधिकृत कला पारंगत दर्जेदार, अनूभवी व न्याय देणारे कलावंत घ्यावेत, कलावंतांना एसटी बस मोफत प्रवास सवलत द्यावी, बेघर कलावंताना प्राधान्याने घरकूल मंजूर करावे, भजन गायन करणा-या महीला मंडळाला भजनी साहीत्य वाटपात प्राधान्य द्यावे, कलावंताच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी राज्यस्तरावर कलावंत आर्थीक विकास मंडळ गठीत करून थेट कर्ज योजना सूरू करावी, ग्रामीण तथा शहरी भागातील पंजीकृत मंडळाला शासकीय निधीतून कलावंत भवन बांधणीसाठी शासकीय जागा व निधी मंजूर करावा, शालेय अभ्यासक्रमात कला – संगीत हा विषय घेवून कलेचा सांस्कृतिक वारसा यूवा वर्गामधे जोपासणे व वृध्दिंगत करण्याचे नियोजन करावे आदी मागण्यांसंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेश महासचिव ॲड.श्याम खंडारे यांनी दिली.