आंदोलनकर्त्यांनी सिलेंडरला हार लावून चुलीवर केला स्वयंपाक

गॅस दर वाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन
गडचिरोली TODAY
गडचिरोली : केंद्र शासनाने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यानी गॅस सिलेंडरला हार लावून चक्क चुलीवर स्वयंपाक करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 
 

आंदोलनात सहभागी महिला कॉंग्रेस कार्यकर्त्या

घरगुती गॅस सिलिंडरने हजारावर आकडा पार केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला असताना केंद्र सरकार मात्र महागाई कमी करण्याऐवजी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सचिव डॉ. चंदा कोडवते यांच्या नेतृत्वात महिला कॉंग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. 

या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,  प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, विश्वजीत कोवासे, पुष्पलता कुमरे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनु. जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, दिलीप घोडाम, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, रुपेश टिकले, भारत येरमे, घनश्याम मुरवतकर, नितेश राठोड, विपुल एलट्टीवार आदींसह मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक, महिला आणि काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.