अज्ञात इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह

ठाणेगाव येथील घटना
गडचिरोली TODAY
आरमोरी: विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याची घटना तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात २ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरु केला आहे.   

प्राप्त माहितीनुसार, ठाणेगाव येथील शामराव भुरसे यांनी शेतातील विहीरीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी जावुन शाहनिशा केली असता, विहीरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व आरमोरी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे. प्रेताचे शवविच्छेदन आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असुन अनोळखी मृतदेहावर अंतीमविधी करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत. 
मृतकाच्या अंगावर पिवळ्या रंगाचे त्यावर निळया उभ्या रेषा असणारा फुल शर्ट, कथ्या रंगाचा फुल पॅन्ट व त्याच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये तांबूस रंगाच्या धातुची अंगठी घातलेली आहे. सदर मृतक इसमाचे वय अंदाजे ४० वर्षे असून उंची ५.७ फूट आहे. सदर इसमाबाद्दल काहीही माहिती मिळाली तर ९०७९२०११००, ०७१३७२९५५३८, ८८३०९५३६२२ या मोबाईल क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा. असे आवाहन आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी केले आहे.