दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

संग्रहित छायाचित्र

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दहावीचा विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास देसाईगंज नगर परिषद अंतर्गत येत असलेलया जुनी वडसा येथे उघडकीस आली. प्रथमेश ईश्वर पत्रे (15) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्रथमेश हा इयत्ता 10 वीचा विद्यार्थी असून सद्यस्थितीत बोर्डाची परीक्षा सुरु आहे. दरम्यान शनिवार आईवडील कामासाठी घराबाहेर गेले होते. तर त्याची बहिण शाळेतून घरी आली असता प्रथमेश हा घरातील बेडरुममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत तिला आढळून आला. घटनेची माहीती मिळताच देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून वृत्त लिहीस्तोवर प्रथमेशच्या आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.