चामोर्शी पोलिसांची कारवाई : चार दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी पोलिसांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनात चार दारू विक्रेत्यांवर कारवाई करुन एकूण 50 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चामोर्शी पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर व तस्करांवर पाळत ठेवली आहे. दरम्यान, 3 मार्चला चामोर्शी पोलिसांनी तालुक्यात धडक मोहीम राबवून शहरातील वाळअवंटी चौक येथील भीमराव उमाजी सहारे व वैशाली भीमराव सहारे यांच्या घरी असलेल्या देशी दारुच्या 27 निपा अंदाजे किंमत 2160 तर विदेशी दारु अंदाजे किंमत 1500 अशी एकूण 3 हजार 660 रुपये किंमतीची दारू जप्त केली. तर लखमापूर बोरी येथील संतोष दडमल याच्या घरून देशी दारूच्या 74 निपा अंदाजे किंमत 5920 रुपयांची दारू जप्त केली. 4 मार्च रोजी तालुक्यातील कळमगाव येथील देविदास विश्वनाथ चुधरी याच्याकडून देशी दारू अंदाजे किंमत 1280 तर सचिन लक्ष्मण मुळेवार रा. सावली जि. चंद्रपूर याच्याकडून वाघोली नदी घाटावरून प्लास्टिकच्या चुंगळीमध्ये 90 एमएलच्या पाचशे निपा अंदाजे 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करून दारुबंदी कायद्यान्वये चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदर कारवाई पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, शालिकराम गिरडकर यांच्यासह पोहवा संदीप भिवणकर, दिलीप खोब्रागडे, पोना सुमित गायकवाड, मंगेश साखरे, वासुदेव अलोने आदींनी पार पाडली.