GADCHIROLI POLICE : होळीच्या सणानिमित्त ४० दारूविक्रेते स्थानबद्ध

GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : शहरासह तालुक्यातील जवळपास ४० दारूविक्रेत्यांना पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया गडचिरोली पोलिसांच्या वतीने होळीच्या दिवशी उशिरापर्यंत सुरु होती. यामुळे जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील दारूविक्रेत्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू असूनही अनेक दारूविक्रेते चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत आहेत. अशातच होळीच्या सणानिमित्त दारूची विक्री झाल्यास भांडण-तंटे होण्याची शक्यता अधिक असते. सोमवारी दिवसभर दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु होती. विशेष म्हणजे, होळीच्या दिवशी जवळपास ४० दारूविक्रेत्यांना पकडून नजरकैद ठेवण्याची प्रक्रिया सुरु आहे. सोबतच धुलीवंदनाच्या दिवशी शहरातील दारूविक्रेत्यांना दिवसभर स्थानबद्ध ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी दिली. गडचिरोली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील मद्यपींना दारू मिळणे कठीण झाले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या नेतृत्वात पोलिस स्टेशनच्या डीबी पथकासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.