गाव संघटनेने होळीच्या सणानिमित्त थांबवली अवैध दारूविक्री

-विविध गावात अहिंसक कृती
GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : होळीच्या सणानिमित्त गावात होणारी अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील विविध गावातील महिलांच्या संघटनांनी अहिंसक कृती करीत दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

कुरखेडा तालुक्यातील डिप्रा टोला येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटनेने अहिंसक कृती करीत तीन जणांची दारू नष्ट केली. नान्ही येथील 4 घरी व चिखली येथील 3 घरी अहिंसक कृती करीत अवैध दारूची विक्री बंद केली. यात 48 देशीचे टिल्लू व 20 लिटर मोहाची दारू एकूण रक्कम 5600 रुपयाचा माल नष्ट केला. सोबतच यापुढे दारु विक्री न करण्याची ग्वाही दारू विक्रेत्यांकडून संघटनेच्या सदस्यांनी घेतली. यावेळी मुक्तीपथ तालुका टीम उपस्थित होती.