‘या’ शहरातील व्यवसायिकांना प्लास्टिकचा वापर करणे पडले महागात, भरावा लागला दंड

दुकानाची तपासणी करताना मुख्याधिकारी खोत व कर्मचारी

-दुकाने, हॉटेलमध्ये तपासणी ; 20 किलो प्लास्टीक जप्त

GADCHIROLI TODAY
अहेरी : शहरातील दुकानात एकल प्लास्टिकचा वापर, विक्री, साठवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात येताच नगरपंचायतीने धडक मोहीम राबवत सर्व दुकाने, हॉटेलमध्ये तपासणी केली. या कारवाईत 20 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आला.
अहेरी शहरातील मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वावर होत असल्याचे निदर्शनास येताच नगर पंचायतचे मुख्याधिकारी दिनकर खोत यांनी शहरात धडक मोहीम राबवित सर्व दुकानांची तपासणी केली. या कारवाईत 20 किलो एकल प्लास्टिक जप्त करून 20 हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला. सदर मोहीम मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे, पाणी पुरवठा अभियंता धर्मेंद्र घोडे, शहर समन्वयक प्रमोद पिलारे, प्रभाकर पेंदाम यांनी केली.