Breaking – धक्कादायक : नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

संग्रहित छायाचित्र

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील एका युवकाची नक्षल्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनाथ नरोटे (२६) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, साईनाथ हा जिल्हा मुख्यालयी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. होळीच्या सणानिमित्त हा युवक आपल्या स्वगावी आला होता. मात्र, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी साईनाथला घरून उचलले. त्यानंतर गोळी झाडून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे.