जिल्ह्यात तीन दिवस पावसाची शक्यता

संग्रहित छायाचित्र

प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. 
हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार गडचिरोली जिल्ह्यात 14 व 15 मार्च रोजी एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर 16 मार्च रोजी एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे.