चोरट्यांनी मौल्यवान वस्तू लंपास करीत घराला लावली आग

मालेवाडा येथील घटना
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : मालेवाडा येथील वैद्यकीय व्यवसायिक तथा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री डॉ. मनोहर आत्राम यांच्या घरात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी घरफोडी करीत मौल्यवान वस्तू लंपास केले. चोरटयांनी एवढ्यावरच न थांबता घराला आग सुद्धा लावल्याने फर्निचरसह अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
रविवारी डॉ. आत्राम आपल्या खाजगी कामाने मुंबई येथे गेले होते तर त्यांचा कूटूंबातील इतर सदस्य कूरखेडा येथे रात्री मूक्कामाने होते. नेमकी हिच संधी साधत चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश करीत कपाट फोडून सोन्याची साखळी व अन्य काही वस्तू लांबविल्या. सकाळच्या सुमारास शेजाऱ्यांना त्यांच्या त्यांचा घरातून धूळ निघत असल्याचे दिसताच त्यानी भ्रमनध्वनीवरून घटनेची माहिती आत्राम कूटूंबियाना दिली. त्यानी लगेच मालेवाडा येथे पोहचत घराचा समोरील दार उघडून बघीतला, तेव्हा खोलीतील एक कपाट फोडून वस्तू लंपास करण्यात आल्याचे दिसून आले. खोलीत आग लागल्याने येथील फर्निचर, टिव्ही, कपडे, गादी तसेच अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाले होते. त्यामूळे त्यांचे मोठे आर्थीक नूकसान झाले. घटनेची तक्रार मालेवाडा पोलीस मदत केंद्रात प्राप्त होताच प्रभारी पोलीस अधिकारी राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व तपास सूरू केला आहे.
खोलीत नेमकी आग चोरटयांनी लावली की काही अन्य कारणाने आग लागली याबाबत चौकशी सूरू आहे. महावितरणचा अभियंताकडून सुद्धा शार्टसर्कीटचे कारण असू शकते काय? याबाबत माहीती घेण्यात येत असल्याचे प्रभारी अधिकारी राठोड यांनी सांगीतले. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.