गुढीपाडव्याला ‘बी-फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉलचे उद्घाटन : गडचिरोलीत येणार अभिनेत्री किशोरी शहाणे

GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयात प्रथमच भव्य स्वरुपात साकारलेल्या ‘बी-फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 22 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी चित्रपत्र सृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) गडचिरोलीत येत आहेत. 
शहरातील चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर बट्टूवार पेट्रोलपंपाच्या बाजुला बी-फॅशन प्लाझा या कापड दुकानाची भव्य शोरुम निर्माण करण्यात आली आहे. या शोरुमच्या उद्घाटनासाठी बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले (ठाकूर) यांनी मराठी अभिनेत्री किशोर शहाणे यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. ग्राहकांचे हित जोपासत देवकुले बंधुंनी शहरातील त्रिमूर्ती चौकात गेल्या 30 वर्षापासून विविध व्हेरायटीचे कपडे, साड्या, शालू, बनारशी शालू, कांजीवरम, पैठणी, सिल्क आदी साड्यांसह, लग्नाचा बस्ता, अहिरपट्टीची मोठी शृंखला आदी ग्राहकांच्या सेवेत अगदी माफक दरात उपलब्ध करुन देत आहेत. ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासोबत चांगली कापड उपलब्ध करुन देण्यासाठी चंद्रपूर महामार्गावर भव्य शोरुमची स्थापना केली आहे. या शोरुमच्या सोहळा 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बी-फॅशन प्लाझाचे संचालक शैलेश देवकुले व हिमांशू देवकुले यांनी दिली.