गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ; कारसह लाखोंचा सुगंधीत तंबाखू जप्त


GADCHIROLI TODAY
गडचिरोली : कारसह एकूण 7 लाख 63 हजार रुपयांचा सुगंधित तंबाकू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने शहरातील धानोरा मार्गावर केली. याप्रकरणी पोलिसांनी कोटगल येथील किराणा व्यावसायिक चेतन विजय गद्देवार (22) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोटगल येथील किराणा व्यावसायिक चेतन गद्देवार याच्याद्वारे कारने शहरातील चिल्लर विक्रेत्यांना सुगंधीत तंबाखू पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने शहरातील धानोरा मार्गावरील तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला. दरम्यान, चेतन गद्देवार हा एमएच 33 व्ही 4329 क्रमांकाची कार घेवून येत असल्याचे दिसून आले. सदर कारला थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये 1 लाख 63 हजार रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखू आढळून आला. पथकाने सर्व सुगंधीत तंबाखू व 6 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 7 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चेतन गद्देवार याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्रील कुडावले, परशुराम हलामी, अतुल भैसारे, सुजाता ठोंबरे, भाऊराव बोरकर यांनी केली.