मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक ; एकाचा मृत्यु तर दुसरा जखमी

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चालक जागीच ठार तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना 14 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील सावरखेडा गावाजवळ घडली. ज्ञानेश्वर सहारे (37) रा. बेलगाव असे मृतक इसमाचे नाव असून कोकसू नंदेश्वर (65) रा. येगलखेडा असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक ज्ञानेश्वर सहारे हे त्यांचे सासरे परसराम बंधू यांच्याकडे पाहूणे म्हणून गेले होते. दरम्यान आज जेवण करुन ते कोकसू नंदेश्वर यांचेसह दुपारी स्वगावाकडे दुचाकीने निघाले होते. दरम्यान सावलखेडा गावापासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीने समोरुन येत असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर सहारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील कोकसू नंदेश्वर यात गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.