शेतकऱ्यांसाठी आपचा चक्काजाम : वाहतूक दोन तास ठप्प

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : शासनाने शेतीला 16 तास अखंडित वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टी कुरखेडाचे वतीने गेवर्धा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातुन परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. विशेष म्हणजे, चक्काजाम आंदोलनामुळे तब्बल 2 तास कुरखेडा-वडसा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
कुरखेडा तालुक्यात कृषी पंपाला केवळ 8 तास विद्यूत पुरवठा केला जात असल्याने उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पीके करपण्याच्या मार्गावर आहे. उद्योगविरहित जिल्ह्यात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन असतांना कृषीपंपाला अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेती कशी पिकवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. हा अन्याय दूर सारण्यासाठी कृषी पंपाला 16 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीला घेऊन आपच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी परिसरातील बहूसंख्य शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित शासन विरोधात घोषणाबाजी करीत न्यायाची मागणी केली.
सदर आंदोलनात आपचे जिल्हाध्यक्ष बालकृष्ण सावसागडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी, कोरची तालुकाध्यक्ष मुकेश नरोटे, तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, तालुका सचिव ताहीर शेख, सह संयोजक अनिकेत आकरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हिरा चौधरी, सह संयोजक दीपक धारगाये, सह संयोजक पंकज डोंगरे, तालुका संयोजक भरत दहलानी, वडसा शहराध्यक्ष आशिष गुटके, युवा सह सचिव अतूल सिंद्राम, अमोल धाबेकर, तबरेज खान, दीपक नागदेवे, अतुल ठाकरे, चंदू ठाकरे, पवन तुमवार, नाजूक लुटे, सौरभ साखरे, शेखर बारापात्रे, शिल्पा बोरकर, सिद्धार्थ गणवीर, वामन पगारे ,परवेज पठाण, प्रमोद दहिवले, आशिष कोवे, धम्मदीप राऊत, योगराज धमगाये, बाबुराव मडावी, हिरा भाऊ उईके, विलास चव्हाण, युवराज साडील, शेतकरी सुनील किन्हाके, जावेद शेख ,जीवन पर्वते, स्वप्निल नागापुरे ,विकास पर्वते ,योगेश नखाते ,नामदेव नखाते, बाळकृष्ण नकाते, वासुदेव बहेटवार, अनिल मचिरके, सुखदेव बुध्द, सोक सुखारे, दीपक सय्याम, भावेश कांबळे, दामोदर बाराई, रोशन टेंभुर्णे, रोशन सय्यद, दिलीप कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.