‘या’ छोट्याशा गावातील युवकांनी इतरांसमोर ठेवला आदर्श

15 वर्षांपासून अवैध दारू हद्दपार
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील लोहारा येथे युवकांच्या निर्णयातून सलग 15 वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद आहे. हे गाव व युवकांचे कार्य इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.
लोहारा हे गाव 35 घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात पाच दारूविक्रेते अवैध व्यवसाय करीत होते. यामुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन भांडण-तंटे होत होते. गावाच्या विकासासाठी अडसर ठरणारी ही समस्या दूर करण्यासाठी गावातील युवकांनी बैठकीचे आयोजन करून दारूमुळे होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. सोबतच अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन जो कोणी दारू विक्री करताना आढळ्यास त्याच्यावर 10 हजारांचा दंड, दारूविक्रेत्यांची माहिती देणाऱ्या 5 हजार रुपयांचे बक्षीस असाही ठराव घेण्यात आला. युवकांच्या या पुढाकाराने गावात अचानक बदल घडून आला व दारूविक्री पूर्णपणे बंद झाली. जवळपास 15 वर्षांपासून गावात कोणीही दारूविक्री करीत नाही. यामुळे गावात शांतता दिसून येत आहे. यासाठी मुक्तिपथ अभियानाने वेळोवेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत दारूबंदी टिकवून ठेवण्याचे आवाहन केले