रेती तस्करीप्रकरणी एलसीबीची मोठी कारवाई – 16 जणांना अटक ; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील नदीघाटातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या 16 रेती तस्करांना अटक करीत 3 कोटी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
आरोपींमध्ये निखील शंकरराव भुरे (35) रा. वाठोडा जि. नागपूर, राहूल बाजीराव घोरमोडे (30) रा. बेटाळा जि. चंद्रपूर, सोनल नानाजी उईके, धनंजय यशवंत मडावी दोघेही रा. डोंगरतमाशी, ता. आरमोरी, यशवंत महादेव मडकाम रा. कुरंडीमाल ता. आरमोरी, नीतेश उमेश मालोदे (30) रा. निलज जि. भंडारा, अफसर अन्वर शेख (26) रा. भिवापूर जि. नागपूर, अब्दूल राजीक मोहम्मद इस्माईल (54) रा. कलीम कॉलनी जि. अमरावती, अताउल्ला खॉं रियाज उल्ला खान (30) रा. लालखडी जि. अमरावती, नरेश तुकाराम ढोक (34) रा. भिवापूर जि. नागपूर, नासीर शेख (19) रा. बिडगाव जि. नागपूर, संतोष पवार (28) रा. तळेगाव ठाकूर ता. तिवसा जि. अमरावती, शेख वसीम शेख जलील (28) रा. मंगरुळ दस्तगिर जि. अमरावती, निखील गोपाल सहारे (23) रा. विरली जि. भंडारा, जावेद अमीर खान (28) रा. पांढुरणा जि. नागपूर, श्याम मन्साराम चौधरी (35) रा. कोर्धा जि. नागपूर यांचा समावेश आहे.
आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होताच 14 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून जेसीबी, पोकलेन ,12 ट्रक, टिप्पर व तस्करांची कार असे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तब्बल 16 जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रेती तस्करांवरील एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरूषोत्तम वाडगुरे, नरेश सहारे, हेमंत गेड़ाम, सतीश कत्तीवार, दिपक लेनगुरे, शुक्रचारी गवई, राकेश सोनटक्के, जगदाले, सुनिल पुट्टावार, मंगेश राऊत, श्रीकांत बाईनवार, श्रीकृष्ण परचाके, सचिन घुबड़े, अकबर पोयाम, संजु कांबले, सुयश वट्टी, माणिक दुधबले, पुर्णचंद्र बांबोले, शगीर शेख, मनोहर येलाम, पंकज भगत, मनोहर पिद्दुरकर आदींनी पार पाडली.