ओबीसींच्या मागण्यांसाठी काँग्रेस ओबीसी सेलचे मुख्यमंत्र्यांना पत्र

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या ओबीसींच्या विविध समस्यांचा पाठपुरावा करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलने केली आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये लागू करण्यात यावी. बिहार राज्याप्रमाणे ओबीसींची जात निहाय जनगणना महाराष्ट्र करण्यात यावी. ओबीसी, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्यात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुरू करण्याच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देतांना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भूपेश कोलते, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, ओबीसी सेल शहर अध्यक्ष अनिल भांडेकर,चारुदत्त पोहने, रवींद्र गंधाते, रवी कवळे उपस्थित होते.