वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बैल ठार

फरी जंगलपरिसरातील घटना
GADCHIROLI TODAY
देसाईगंज : हिंस्त्र वन्यप्राण्याने बैलाची शिकार केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील फरी जंगलपरिसरात १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
फरी गावातील गुराखी देवचंद पेंदाम हे १६ मार्च रोजी नेहमी प्रमाणे चराईसाठी जंगलपरिसरात गुरांचे कळप घेऊन गेले. गावातीलच पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे बैल घरी परत न आल्याने त्यांनी शोधाशोध केला. मात्र, बैलाचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी फरी जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली असता, दुपारच्या सुमारास त्यांचा बैल मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर बैलाची शिकार वाघाने केली की बिबट्याने हे कळू शकले नाही. त्यामुळे वनविभागाने घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसविले आहे.