वज्राघाताने शालेय विद्यार्थिनीचा मृत्यु

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शाळेतून घरी परत जात असतांना वाटेतच अंगावर वीज कोसळल्याने विश्वशांती विद्यालय कुनघाडा रै. येथे इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. स्वीटी बंडू सोमनकर (15) रा. मालेर चक असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
स्विटी सायकलने शाळेतून स्वगावी मालेर चक येथे जात असताना मुसळधार पावसाह विजेचा कडकडाट सुरु झाला. एकाएक तिच्या अंगावर वज्राघात झाल्याने ती सायकलवरुन खाली कोसळली. तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कुनघाडा रै. उपचारार्थ हलवण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तलाठी एन. एम. मेश्राम यांनी घटनेचा पंचनामा करून तात्काळ तहसील कार्यालयास सादर केला.