धानोरा शहरातील घटना : विद्युत स्पर्शाने दोन जनावरांचा मृत्यू

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : विद्युत स्पर्शाने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान धानोरा शहरातील पेट्रोल पंपाजवळ घडली.
धानोरा तालुक्यात सकाळपासूनच वीजगर्जनेसहित पावसाने हजेरी लावली. कालांतराने विद्युत प्रवाह खंडित झाल्याने अर्ध्या दिवसानंतरच विद्यत प्रवाह सुरळीत करण्यात आला. मात्र, पेट्रोलपंप धानोरा जवळील विद्युत खांबावरून कै. जीवनराव पाटील मुनघाटे यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे याच ठिकाणाहून विद्युत प्रवाह गेलेला आहे. पेट्रोल पंपा जवळील विद्युत खांबावरील स्कॅडिंग तुटल्याने एका बाजूने विद्युत तारा खाली पडले व दुसऱ्या बाजू वरील काही भाग हा वरील जिवंत तारांना लागल्याने विद्युत प्रवाह खालपर्यंत पोहोचला. त्याच ठिकाणी जिवंत तारेचा स्पर्श लागल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. एक बैल रमेश सहारे यांच्या मालकीचे असल्याचे कळले. दुसऱ्या बैल मालकाचे नाव कळू शकले नाही.