वाहन उलटल्याने पाच प्रवासी गंभीर

– वांगेपल्लीनजीक गुडेम पुलाजवळील घटना
GADCHIROLI TODAY
अहेरी : तेलंगणा राज्यातून लग्न कार्यक्रम आटोपून चारचाकी वाहनाने अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावी येत असतांना वांगपेल्ली गावानजीकच्या गुडेम पुलाजवळ वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर तर तीघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील सिरपूर तालुक्यातील पेदाबंडा या गावात आयोजित लग्न समारंभ आटोपून छल्लेवाडा येथील काही प्रवासी बोलोरो वाहनाने स्वगावी परत येत होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास गावाकडे परत येत असतांना वांगेपल्ली गावानजीक महाराष्ट्र व तेलंगणा राज्याना जोडणा-या गुडम पुलाजवळ भरधाव वेगात असलेल्या बोलेरो वाहन चालकाचे वाहनावरील निंयत्रण सुटल्याने वाहन उलटल्या गेले. या अपघातात अनिता मिथून बोरकर (34), मिथून संपत बोरकर (34), प्रवीण बापू कूंभारे (22), जोगय्या सूंदीलवार (50), माधव मल्ल्या दूर्गे (36) सर्व रा. छल्लेवाडा हे गंभीर जखमी झाले. तर सुरेशा शेख, शाहरुख शेख, श्रीलता निष्ठूरवार हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अहेरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
अपघाताची माहिती प्राप्त होताच कॉंग्रेस तालतुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, मधूकर सडमेक, राघोबा गौरकार, नामदेव आत्राम, रज्जाक भाई, अशोक आईंचवार, संतोष समूद्दालवार, रामप्रसाद मूजंमकार, गणेश उप्पलपवार, सूरज कोवे, सूरेश दूर्गे यांनी यांनी गंभीर जखमी असलेल्यांवर योग्य उपचार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. तसेच कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष यांना उपचारासाठी सहकार्य करण्यासंदर्भात कळविले.
अपघातग्रस्तांना आर्थिक मदत
अपघाताची माहिती प्राप्त होताच अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना अपघाताची माहिती प्राप्त होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी अपघातग्रस्तांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना आर्थिक मदत केली. तर गंभीर रुग्णांना रेफर करण्यासाठी कार्यकर्त्यांना सुचना केल्या. तसेच संबंधिताना काही मदत लागल्यास त्यांनी निसंकोचपणे मला माहिती द्यावी, मी नक्कीच त्यांना मदत करेन, असे आश्वस्त केले. याप्रसंगी कुमार अवधेशरावबाबा आत्राम, नगरसेवक विकास उइके, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, रविभाऊ जोरीगलवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.