आधारविश्व फाऊंडेशनचा उपक्रम : गुढीपाडव्याला महिलांची भव्य पैदल रॅली

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शहरातील आधारविश्व फाऊंडेशनतर्फे 22 मार्च रोजी गुढीपाडव्याला सकाळी 8 वाजता मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ढोलताशा व लेझीमच्या गजरात महिलांची भव्य पैदल रॅली काढण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी केले आहे.
या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी सकाळी 7 वाजता इंदिरा गांधी चौकातील गेस्ट हाऊसमध्ये जमायचे आहे. तिथेच सर्वांना फेटे बांधून मिळेल. 8 वाजता इंदिरा गांधी चौकातून रॅलीचा प्रारंभ होईल. तिथून बी फॅशन प्लाझा, सपना क्लाथकडून चंद्रपूर रोडवरून पुन्हा इंदिरा चौकातून चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डिंग समोर रॅलीचा समारोप होईल. रॅलीत नऊवारी नथ व फेटा या वेशभूषेत महिलांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता गीता हिंगे 9168164441, सुनीता साळवे, विना जंबेवार, विजया मने, सुचिता धकाते, दिप्ती वैद्य, मीनल हेमके, उज्वला शिंदे यांच्याशी संपर्क करावा.