शिर्डी येथील महापशुधन एक्सो-2023 ला भेट द्या : जिल्हाधिकारी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी येथे 24 ते 26 मार्च या कालावधीत महापशुधन एक्सो-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पशु प्रदर्शनास गडचिरोली जिल्हयातील जास्तीत-जास्त पशुपालकांनी भेट देवुन माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.
हे प्रदर्शन 46 एकर जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यामधील उत्कृष्ट पुशधन, पशुपक्षी सहभागी होणार आहे. या प्रर्दशनातुन पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी दिली आहे.